13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

राजा कायम तणावात असेल, राजकीय उलथापालथ होत राहील; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपूर्ण राज्याचं आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली आहे. भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेली होती..

या घटमांडणीचा अंदाज आज पहाटे वर्तवण्यात आला आहे. या भविष्यवाणीमध्ये राजा कायम तणावात असेल आणि राजकीय उलथापालथ होत राहील असा अदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच यंदा पर्जन्यमान सर्वसाधारण असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भेंडवळ येथील घटमांडणीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी येथील घटमांडणीत व्यक्त केल्या जाणाऱ्या अंदाजावरून राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करीत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असतं. या घटमांडणीत पाऊस, पीक परिस्थिती, हवामान आणि राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला जातो. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या घटमांडणीतील वर्षभराचे अंदाज वर्तवण्यात आले आहे.

पर्जन्यमान कसे असेल?

जून – पाऊस कमी असेल, पेरणी उशिरा होईल.

जुलै – पाऊस सर्वसाधासरणं असेल.

ऑगस्ट – चांगला पाऊस पडेल, अतिवृष्टी होईल.

सप्टेंबर – अवकाळी पाऊस पडले, पिकांचं नुकसान होईल.

पीक परिस्थिती कशी असेल?

भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार पिकांवर रोगराई राहील. कापसाचे उत्पादन मध्यम प्रमाणात होईल, कापसात तेजी असेल. ज्वारी सर्वसाधारण राहील. तूर पिक चांगले आणि मुग आणि उडीद पीक सर्वसाधारण असेल.

तीळ सर्वसाधारण असेल, मात्र नासाडी होऊ शकते. बाजरीचे पीक देखील सर्व साधारण असेल बाजरीचीही नासाडी होईल. तांदळाचे पीक चांगले येईल. गहू सर्व साधारण असेल आणि बाजार भाव तेजित राहील. याशिवाय हरबरा पीक अनिश्चित असेल. कमी-जास्त प्रमाणात पिक येईल. मात्र नुकसान देखील होऊ शकते.

देशासंबंधीचे अंदाज

संरक्षण क्षेत्र मजबूत राहील, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या सुरूच राहतील. देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल आणि चढउतार सुरू राहतील.

राजकीय अंदाज

भेंडवळच्या भविष्यवाणीत राजकीय अंदाज देखील व्यक्त केले जातात. यंदाच्या भविष्यवाणीनुसार, राजा कायम आहे. पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. राजा कायम तणावात असेल आणि राजकीय उलथापालथ होत राहील. नैसर्गिक आपत्ती येत राहतील. भूकंप प्रमाण जास्त असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles