19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बालविवाहाचे आयोजन करणारे वधू व वर यांचे आई-वडील, नातेवाईक, भटजी,मंडपवाले, आचारी, वऱ्हाडी मंडळीवर  होणार गुन्हा दाखल 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अक्षय तृतीया यादिवशी होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे गावांमध्ये दवंडी देण्याचे निर्देश

बीड |

दि. 22 एप्रिल 2023 रोजी वार शनिवार आहे. या शुभमुहूर्तावर अक्षय तृतीया यादिवशी देशभरात मोठ्या प्रमाणात बाल विवाह आयोजित होत असून या दिवशी बाल विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाल विवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा असून बाल विवाहप्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होवू नये म्हणून आवश्यक त्या उपाय योजना करणे आवश्यक आहे.

 

        बाल विवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे बाल विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदवला जाणे अपेक्षित आहे. तसेच सदर कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात बाल विवाह होवू नये यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, रॅली आदी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व सरपंच / ग्रामसेवक यांना अक्षय तृतीयाच्या दोन दिवस अगोदर बाल विवाह कायद्याने गुन्हा आहे.

 

         बालविवाहाचे आयोजन करणारे वधू व वर यांचे आई-वडील, नातेवाईक, भटजी, मंडपवाले, आचारी, वऱ्हाडी मंडळी या सर्वांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, या आशयाची दवंडी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीप मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपापल्या गावी उपस्थित रहावे. बाल विवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत चाइल्ड लाईन क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्यात यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी. अक्षय तृतीया या दिवशी बीड जिल्ह्यात बाल विवाह होणार नाही. याची दक्षता घ्यावी.

 

           अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, धानोरा रोड, वरद प्राईड कॉम्प्लेक्स ता. जि. बीड या ठिकाणी संपर्क साधण्यात यावा. Email –dwcdbeed@gmail.com. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सुधीर ढाकणे यांनी केले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles