26.3 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img

पैसे दान केल्याचं दाखवून कर चुकवणाऱ्या करदात्यांना आयकर विभागाने नोटीस धाडली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पैसे दान केल्याचं दाखवून कर चुकवणाऱ्या करदात्यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. यात अनेक धर्मादाय संस्थांचा समावेश असून सुमारे 8 हजार करदात्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

आयकर विभागाने त्यांच्याकडे जमा माहितीचं विश्लेषण करून हे नोटीस सत्र सुरू केलं आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 8 हजार असे करदाते आहेत, ज्यांनी फक्त कर चुकवण्याच्या हेतूनेच दान केल्याचं दिसून येत आहे. यात धर्मादाय संस्था, नोकरदार आणि व्यावसायिकांचाही समावेश आहे. विभागाने त्याच्याकडे जमा असलेल्या आयकर विवरणाचं पत्रांचं विश्लेषण केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. 2017-18 आणि 2020-21 या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये ही करचुकवेगिरी उघड झाली आहे.

विभागाने विवरण पत्रांचं विश्लेषण केल्यानंतर विभागाला असं लक्षात आलं की अनेक करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या हिशोबाने दान केलं नव्हतं. तर, ज्या करश्रेणीत त्यांचा कर कापला जाणार होता, त्या श्रेणीतील रकमेइतकंच दान त्यांनी दिलं होतं. त्यामुळे आता अशा 8 हजार करदात्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles