19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्यवेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल’,,फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

राज्यात सत्तांतर झालं तेव्हापासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनेक नेत्यानी या काळात पक्षांतरही केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा नेते वेगवेगळे दावे करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये फुट पडणार असल्याचे तसेच अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे असे अनेक दावे दिवसेंदिवस नेते करताना दिसून येतात.

अशातच ‘शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. येत्या काळात सध्याच्या सरकारमध्ये कोणताच बदल होणार नसून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील’, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला आहे. तर ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्यवेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल’, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणं बाकी आहे. त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस यांनी हे नवं राजकीय भाकित केलं आहे.

ते म्हणाले कि,’उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे त्यांचे सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना परत सत्तेत आणून बसवणार नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे, त्यांच्याही ही बाब लक्षात आली असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणे योग्य नाही. मात्र, आमच्या भूमिकेनुसार वाटते की निकाल योग्य पद्धतीने लागेल’, असं ते म्हणालेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles