24.7 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

spot_img

सहायक पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांची ट्रॅक्टर केन्या व वाळू साठ्यावर कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंदाजे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिला

 

गेवराई |

गोदावरी नदी पात्रात काही वाळू माफिया ट्रॅक्टर हेडला केनी जोडुन नदी पात्रातील पाण्यातुन अवैध रित्या वाळुचा उपसा करत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांना मिळताच त्यांनी पथकाला सोबत घेऊन सापळा रचून अवैध रित्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर, केन्या, अंदाजे 1000 ते 1200 ब्रास अवैध वाळु साठा असा एकूण अंदाजे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गेवराई पोलिसांच्या हवाली केल्याची घटना मंगळवार दि.11 रोजी पहाटे खामगाव- सावरगाव शिवारामध्ये घडली या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. 10 रोजी सहायक पोलीस अधीक्षक श्रीधीरज कुमार यांना गेवराई तालुक्यातील खामगाव- सावरगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर हेडला केनी जोडुन नदी पात्रातील पाण्यातुन अवैध रित्या वाळुचा उपसा करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी मध्ये रात्री आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सापळा रचला व अवैध वाहतूक करणाऱ्या 08 ट्रॅक्टर, 10 केन्या, अंदाजे 1000 ते 1200 ब्रास अवैध वाळु साठा असा अंदाजे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाळु उपसा करणारे इसम पोलीस कारवाईचा छापा पडताच पळुन गेले आहेत. सदर सर्व ट्रॅक्टर आणि केन्या पोलीस कारवाईमध्ये पोलीस स्टेशन गेवराई येथे जमा केलेल्या असुन त्यांचे विरुध्द महसुल प्रशासाना मार्फतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी लेखी रिपोर्ट दिलेला आहे. या कारवाईत पथकातील उप विभागीय कार्यालयाचे सपोनि निलेश इधाटे, पो.ह अतिषकुमार देशमुख,अशोक नामदास, गणेश नवले, संतराम थापडे, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे यांचा समावेश होता.

 

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles