13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

“पंकजा मुंडेंनी अहंकार सोडावा” नामदेव शास्त्रींचा टोला! पंकजा मुंडेंचं जशास तसं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यातल्या भारजवाडी या ठिकाणी नारळी सप्ताह असल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांना अहंकार आहे तो त्यांनी सोडला पाहिजे अशी टीका नामदेव शास्त्रींनी केली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. बीड जिल्ह्यात या वादाची चर्चा चांगलीच रंगल्याचं पाहण्यास मिळतं आहे.
नेमकं काय म्हणाले नामदेव शास्त्री?

“मी पंकजाला मुलगी मानलं आहे. त्यामुळे मी तिच्या विरोधात कधीच जाणार नाही. मात्र तिच्या जवळचे चमचे हरामखोरपणा करतात. पंकजा मुंडे यांनाही खूप अहंकार आहे. त्यांनी त्यांचा अहंकार सोडला पाहिजे. पंकजा आणि धनंजय मुंडे दोघांचंही आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही मोठे झालात तरीही तुम्हाला स्वाभिमान असला पाहिजे अहंकार नाही.” असं म्हणत नामदेवशास्त्रींनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.
पंकजा मुंडे यांनी काय दिलं उत्तर?

नामदेव शास्त्रींनी जो टोला लगावला, त्याला पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणातून जशास तसं उत्तर दिलं आहे. ” माझा जन्म स्त्रीच्या रुपात झाला आहे. मी जर जोरात बोलले तर तो अनेकांना अहंकार वाटतो. एखादा पुरुष जोरात बोलला तर त्याला वाघ म्हटलं जातं. १०० चुका करणाऱ्या पुरुषाला सुधारण्याची संधी मिळते. मला कुठलाही अहंकार नाही. मी फक्त गडाच्या पायथ्याची एक पायरी आहे.” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना जशास तसं उत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यात वाद काय आहे?

पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यातला वाद गेल्या काही वर्षांपासून आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात सहभागी होत असत. त्यांच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली होती. मात्र काही दिवसांनी परळीत गोपीनाथगड हे स्थळ पंकजा मुंडे यांनी उभारलं. याच मुद्द्यावरून नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद झाला. त्यानंतर भगवानगडाचे नामदेवशास्त्री यांनी भगवान गडावर दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली. त्यामुळे पंकजा मुंडे या दरवर्षी गोपीनाथ गडावर दसरा मेळावा घेतात.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles