20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन; १ एप्रिलपासून वाढ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिलपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.

या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन लाख सात हजार ९६१ कर्मचाऱ्यांना होणार आहे.

मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने अखेर त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० आणि अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे, असे महिला व बाल विकास विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मानधन..

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पांतंर्गत ९७ हजार ४७५ अंगणवाडी सेविका, ९७ हजार ४७५ मदतनीस व १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण दोन लाख सात हजार ९६१ मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के असे प्रमाण आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles