20.4 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img

पत्नी प्रियकरासोबत पळून गेली; पतीने केला सासऱ्याचा गोळ्या घालून खून

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जालना |

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग अनावर झालेल्‍या जावयाने सासऱ्याचा गोळ्या घालून खून केला. ही धक्‍कादायक घटना आज (दि.२९) सकाळी अंबड शहरातील शारदानगर (जि.जालना) भागात घडली. पंडीत भानुदास काळे असे खून झालेल्‍या सासर्‍याचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अंबड शहरातील शारदानगर भागात पंडीत भानुदास काळे राहत होते. त्यांच्या मुलीचे लग्न भाचा किशोर शिवदास पवार याच्यासोबत काही वर्षापूर्वी झाले होते. किशोर पवार हा अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथील रहिवासी होता. सध्या तो पाचोड येथे स्थाथिक झाला आहे. लग्नानंतर किशोर पवार याला चार अपत्ये झाली.

सासर्‍यांनी चिथावणी दिल्‍यानेच पत्‍नी पळून गेल्‍याचा संशय

काही दिवसांपूर्वी किशोरची पत्नी पाचोड येथील प्रियकरासोबत पळून गेली. सासरे पंडित काळे याने चिथावणी दिल्यानेच पत्नी पळून गेल्याचा संशय किशोर पवार यास होता. आज (दि.२९) सकाळी किशोर पवार याने अंबड येथे भरदिवसा पंडीत काळे यांच्‍या डोक्यात गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. यानंतर किशोर घटनास्थळावरुन पसार झाला. अंबडचे पोलीस निरीक्षक शिरीषकुमार हुंबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी किशोर पवार याच्‍या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles