13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

टेट परीक्षेचा निकाल जाहीर; अनेक उमेदवारांना दीडशेपेक्षा जास्त गुण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शैक्षिणक अभियाेग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये अनेक उमेदवारांना दीडशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. प्रश्नांची संख्या, वेळ आणि काठिण्य पातळी पाहता दीडशेहून अधिक गुण घेणे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे जास्त गुण असलेल्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करावी, अशी मागणी उमेदवारांकडून हाेत आहे.

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयबीपीएस संस्थेमार्फत टेट परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन माध्यमातून २ लाख १६ हजार ४४ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. भरतीची प्रक्रिया पवित्र पाेर्टलमार्फत राबविण्यात येत आहे. परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. २४ मार्च राेजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. दरम्यान, या परीक्षेत दाेनशे गुणांपैकी अनेकांना दीडशेहून अधिक गुण मिळाले आहेत.

परीक्षेत असंख्य उमेदवारांना पूर्ण प्रश्नपत्रिका साेडविता आलेली नाही, वेळेअभावी केवळ १५० ते १६० प्रश्न साेडविता आले आहेत. त्यात काही जणांना दाेनशेपैकी चक्क १८६, १८४ आणि १७५ गुण मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दीडशेपेक्षा अधिक मार्क घेणाऱ्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करण्यासह चाैकशी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे डीटीएड, बीएड स्टुडंटस् असाेसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles