राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार नेहमीच चर्चेत असतात. शरद पवार म्हटल की, राजकीय वर्तुळ अन् घडणाऱ्या घडामोडींवर येणारी प्रतिक्रिया याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले असते. मात्र, सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या खासगी गोष्टीमुळे ते चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सध्या शरद पवार यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो पाहिल्यानंतर ते शरद पवारच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर हो तो शरद पवारांचाच फोटो आहे.
https://www.instagram.com/p/CqCuRhODkSr/?utm_source=ig_web_copy_link
खासदार सुप्रिया सुळे नेहमी वडील शरद पवार यांच्यासंदर्भात आपलं असणार प्रेम हे विविध माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. वडिलांबद्दल अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पवारांचा कधी काळचा फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे त्या फोटोमध्ये शरद पवारांची दाढीची अधिक चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांचा बसलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो किमान ४० ते ५० वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोसह सुप्रिया सुळेंनी “नॉस्टॅल्जिया” अशी एका शब्दाची कॅप्शन दिलीय.
पण या फोटो विशेष लक्ष वेधलं आहे ते म्हणजे पवारांच्या दाढीमुळे. जनतेनं शरद पवारांना त्यांच्या सध्याच्या लुकमध्येच पाहिलं आहे. त्याामुळे काळीभोर दाढी पाहात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुलगानी दाढी पाहून शरद पवार केवळ राजकारणीच नव्हे तर स्टायलीशदेखील अशा कमेंट्स सोशल मीडियात रंगल्या आहेत.
“शरद पवारांना फ्रेंचकटमध्ये कधीच पाहिलेलं नाही. ते फारच वेगळे दिसत आहेत”, अशी कमेंट एका युजरने केलीय. Dashing Look अशी कमेंट एका युजरने केलीय.