13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

चोरांकडून घरात घुसून चोरी, १२ तासांनी सोनं अन् पैसे ठेवले परत; कारण ऐकून अवाक् व्हाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

शहरातील धांडे गल्ली भागातील काळे कुटुंबीयांच्या घरातील अज्ञात चोरट्याने घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने पळवण्याचा प्रकार हा तीन दिवसांपूर्वी घडला होता. मात्र, यानंतर पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस प्रशासन हे घटनास्थळी दाखल होत, या घटनेची कसून चौकशी करून या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेतला. विशेष बाब म्हणजे, त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी हे सोनं आणि दागिने ज्या ठिकाणाहून चोरले होते, त्याच ठिकाणी परत आणून ठेवल्याचे आज पोलिसांनी सांगितलं आहे.

बीड शहरातील धांडे नगर भागातील लता हरिहर काळे (वय ६५) हे त्यांच्या पतीसह आपल्या निवासस्थानी राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या चोरीत आठ तोळे सोनं आणि १६ हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली होती.

मात्र, ही चोरी झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी आपली खाकी दाखवत चौकशी केली. यानंतर दोन दिवस सलग पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी चौकशीच सत्र चालू असल्याने चोरट्याने पोलिसांच्या धाकाने ही रक्कम आणि सोने ज्या ठिकाणाहून चोरले होते त्याच ठिकाणी परत आणून ठेवले. ही बाब लक्षात येताच काळे कुटुंबातील लता काळे यांनी ए.पी.आय रवी सानप यांना माहिती देऊन आमचं सोनं परत मिळाल्याचं सांगितलं.

रवी सानप यांच्या सांगण्यावरून डीबी पथकाचे अशपाक शेख मनोज परजणे यांनी त्या सोन्याची आणि रकमेची तपासणी करत कुटुंबाला विचारणा केली असता सोनं आणि पैसे हे जशास तसे त्या ठिकाणी पाहायला मिळाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles