16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पाच कोटी तीस लाख रूपयांची फसवणूक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नेवासा |

नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथील भांगे ऑरगनिक केमिकल कंपनीचे संचालक संजय भांगे व स्मिता भांगे यांनी सव्वा पाच कोटी रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार नेवासा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

आष्टी (जि.बीड) येथील मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रायव्हेट लि. या कंपनीचे व्यवस्थापक अफसर रतन शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, खडका फाटा येथील भांगे ऑरगॅॅनिक केमिकल कंपनीशी आमच्या कंपनीचा संयुक्त करार झाला आहे. त्यानुसार भांगे कंपनीला कच्चा माल पुरवून त्यांनी तयार केलेला पक्का माल (इथाईल एसिटेट) परत आमच्या कंपनीला द्यायचा. सदर पक्क्या मालाच्या खरेदी-विक्रीत जो नफा होईल, त्यात 60 टक्के आमच्या कंपनीचा व 40 टक्के भांगे कंपनीला देण्याबाबत जुलै 2021 मध्ये संयुक्त करार झालेला आहे. या करारानुसार अनामत म्हणून 11 लाख रूपये व बॉयलरच्या कामासाठी 28 लाख रूपये आमच्या कंपनीने भांगे कंपनीला दिले. परंतु, भांगे कंपनीने हे पैसे बॉयलरच्या कामासाठी न वापरता कंपनीचे संचालक संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे यांनी वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय संजय भांगे यांनी सांगितलेल्या कंपनीकडूनच आम्ही कच्चा माल विकत घेत होतो. आमची कंपनी ज्यांच्याकडून कच्चामाल विकत घेत होती, ती कंपनी आम्हाला जास्त दरात माल देत आहे, याची जाणीव व माहिती संजय भांगे व स्मिता भांगे यांना होती. तरीही त्यांनी आम्हाला त्यांच्या मर्जीनुसारच कच्चा माल विकत घेण्यास लावले. त्यामुळे सप्टेंबर 2021 ते ऑक्टोबर 2021 या दरम्यान आमच्या कंपनीचे दोन कोटी 93 लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यानंतरही भांगे यांनी आमच्या कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आपला कौटुंबिक वाद पुढे करत सुमारे तीन महिने कंपनीचे उत्पादन बंद ठेवले.

अशा प्रकारे दोन कंपन्यांतील झालेल्या करारानुसार भांगे केमिकल आरगॅनिक केमिकल कंपनी वागली नसून, आमच्या कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने संजय भांगे व स्मिता भांगे यांनी आमच्या कंपनीकडून वेळोवेळी घेतलेल्या रकमांच्या माध्यमातून पाच कोटी तीस लाख रूपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे हे करत आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles