बीड
राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, जि. बीड च्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक सुद्धा दि. 14 मार्चपासून 2023 सुरुकेलेल्या बेमुदत संपात पुढाकाराने सहभागी आहेत.बीड जिल्हयात काही तालुक्यात काही गावात अवकाळी पाऊस व गारपिट चालू आहे. या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे, वित्त व प्राणहानीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक संपात सहभागी असतांना देखील शेतकरी बांधवांना तातडीने आर्थिक लाभ मिळावेत, नुकसान भरपाई मिळावी, या मानवतेच्या दृष्टीकोनातून संवेदनशिलनेने नोंदी गावात, शेतात जावून त्या- त्या तहसिलदार साहेंबाच्या ग्रुपवर अपलोड करतील, संपावर असल्याने स्वाक्षऱ्या करणार नाहीत. अशा प्रकारचा तातडीचा निर्णय तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या संघटना प्रमुखांशी चर्चा करून समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष बाबा बडे, सरचिटणीस रामचंद्र ठोसर, कार्याध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष परमेश्वर राख, संजय हंगे, एस.पी. जगताप व मार्गदर्शक डी. जी. तांदळे, मधुकर शेळके, सखाराम काशिद, कृष्णा आगलावे, राख तात्या यांनी घेतल्याची माहिती समितीचे निमंत्रक राजकुमार कदम यांनी दिली आहे..
https://patodasanchar.com/805/