- Advertisement -
अंबाजोगाई | राहूल देशपांडे
शुक्रवार शनिवार सलग दोन दिवस दुपारी निम्मा तालुका पावसाने अक्षरशः झोडपुन काढला, विजेचा कड़कडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या या टपोर्या गाराच्या पावसामुळे शेतकऱ्याची मोठी तारांबळ उडाली. आधीच अस्मानी संकटातून शेतकरी सावरत नाही, तोच पुन्हा अवकाळीचे संकट ओढावल्याने बळीराजा पुरता हताश झाला आहे.
शुक्रवार शनिवार दुपारी अंबा.सह साखर कारखाना, वाघाळा, राडी, कुंबेफळ ,सातेफळ, ममदापुर,पाटोदा, देवळा, धानोरा तसेच धा.पिंपळा, पुस, घाटनांदुर, तळणी, उजनी या व इतर परिसरात अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे
गहु,ज्वारी, हरभरा,कांदा, मका पिकाचे फार मोठे नुकसान झाले.
तालुक्यात काही दिवसांपासून अधून मधून ढगाळ वातावरण होते व अजुनही आहे त्यात शुक्रवार शनिवार गारांचा पाऊस कोसळल्याने गहू, हरबरा,ज्वारी, मका या पिकांना झोडपुन काढल्याचे वृत्त होते शुक्रवार शनिवार शहरात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होते. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे व-हाडी मंडळीची मोठी दैना झाली. अवकाळी पाऊस लग्नात विघ्न ठरल्याने वर वधु व परीवाराची निराशा झाली.
काही ठिकाणी बदलत्या हवामानाचा अंदाज आल्याने हरभरा काढणीच्या कामांना ब्रेक लागलेला आहे. शुक्रवार शनिवार अवकाळी आणि गारांसह पडलेल्या पावसाने झोडपुन काढल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.
अंबाजोगाई शहर आणि परिसरातील अवकाळी, गारांच्या पावसाचे,शेतीच्या नुकसानीचे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांनी सोशल मिडीयावरून व्हायरल केले. पुरे पिकच हातचे गेल्याने आता शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे.