Homeमहाराष्ट्र खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी तक्रार प्राप्त होताच कारवाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस By [email protected] March 18, 2023 99 - Advertisement - मुंबई |- Advertisement - - Advertisement - - Advertisement - राज्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदेशीर सावकारांच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्यात येते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य उमा खापरे यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. काहीवेळेस लोक तक्रारी करण्यासाठी समोर येत नाही. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. तसेच सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिसदस्य समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी, अशी दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच अधिनियम 2014 च्या अभ्यासासाठी विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल मागवून त्यातील शिफारशींचा अभ्यास करून त्या अनुषंगाने कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर सावकारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला. FacebookWhatsAppTwitterTelegram Previous articleएस टी प्रवासात महिलांना हाफ तिकीटाची सूट, पण नियम अटी काय?Next articleराज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेच्या टिझरची जोरदार चर्चा संबधित बातम्या Uncategorized नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे पाटोदा शहराला १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा ; निलाताई पोकळे क्राईम बीडमध्ये बालविवाह रोखला; नवरदेवासह ५०-६० वऱ्हाड्यांवर गुन्हे दाखल क्राईम “कोणताही खरा प्रियकर आपल्या जोडीदाराबरोबरचे खासगी क्षणांचे फोटो काढून त्याला ब्लॅकमेल करणार नाही,”-उच्च न्यायालय - Advertisement - Latest Articles Uncategorized नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे पाटोदा शहराला १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा ; निलाताई पोकळे क्राईम बीडमध्ये बालविवाह रोखला; नवरदेवासह ५०-६० वऱ्हाड्यांवर गुन्हे दाखल क्राईम “कोणताही खरा प्रियकर आपल्या जोडीदाराबरोबरचे खासगी क्षणांचे फोटो काढून त्याला ब्लॅकमेल करणार नाही,”-उच्च न्यायालय जरा हाटके आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अशुभ असेल. दिवसभर तुमच्या आरोग्यात चढ-उतार होतील. काम, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमुळे मानसिक अशांतता निर्माण होईल वाचा आजचे... ताज्या बातम्या नव्या निविदा काढण्यास आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी; निधीची जुळवाजुळव करताना फडणवीसांची दमछाक Load more