बीड |
अल्पवधीत आपल्या कार्यातून नावलौकिक मिळविलेल्या ‘हायटेक एज्युकेशन’ ला ब्लाइंडविंक मीडिया कंपनीकडून भारतातील नामांकित असलेल्या सर्वोत्कृष्ट कौन्सिलिंग ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त झाला आहे.मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेचा दरवर्षी गौरव करण्यात येतो.त्यानुसार यावर्षीचा हा पुरस्कार हाय टेक ग्रुपचे संचालक सुनील राऊत यांना प्रदान करण्यात आला असून बंगलोर येथील ताज हॉटेलमध्ये या गौरव सोहळा पार पडला.दरम्यान हायटेक एज्युकेशनला मिळालेल्या या पुरस्कारबद्दल राऊत बंधूंचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
बीडमध्ये सुनील आणि अनिल या राऊत बंधूंनी एकत्रित येत हायटेक एज्युकेशनची स्थापना केली होती.अंत्यत कमी कालावधीत आणि कमी खर्चात त्यांनी बीड जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण असताना योग्य मार्गदर्शन करून योग्य चॉईस फिलिंग करून वैद्यकीय प्रवेश मिळवून दिले आहेत.योग्य कागदपत्राची आधीच माहिती सांगितल्यामुळे कित्येक पालकांचे लाखो रुपये वाचले आहेत.Neet फॉर्म भरण्यापासून ते कॉलेज प्रवेश प्रकिर्या होईपर्यंत योग्य मार्गदर्शन करून कमी शुल्कात कौन्सिलिंग करतात.राज्यातील सर्व जिल्ह्यातून बीड मध्ये पालक येत आहेत.राज्यभरातून खात्रीशीर आणि विश्वासहर्ता टिकविण्यात त्यांना यश आले असून यावर्षी एमबीबीएससाठी ६० तर बीएएमएससाठी ६८ व इतर वैद्यकीय प्रवेशासाठी मिळून १६८ विद्यार्थ्यांचा मेडिकलसाठी प्रवेश हायटेकने मिळवून दिल्या आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्लाइंडविंक
मीडिया कंपनीने त्यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कौन्सिलिंग ऑफ द इयर पुरस्कारने सुनील राऊत यांचा गौरव केला.सिनेअभिनेत्री अमृता राव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून राऊत बंधूंचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पुरस्कारने वाढविली आणखी जबाबदारी
सर्वोत्कृष्ट कौन्सिलिंग ऑफ द इयर पुरस्काराने झालेला गौरव माझ्यासाठी अविस्मरणीय असून सिनेअभिनेत्री अमृता राव यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.या पुरस्कारामुळे आमच्यावरील जबाबदारी आता आणखीन वाढली असून आजपर्यंतच्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र करू शकल्याचे आम्हाला समाधान आहे.यावर्षी ३०० पेक्षा अधिक विद्यार्थाना आम्ही भारतात अनेक ठिकाणी त्यांच्या योग्य गुणांनुसार प्रवेश मिळवून देणार.सकाळी ९ पासून आम्ही रात्री १० पर्यंत विद्यार्थी, पालकांना त्यांचे Neet आणि cet चे फॉर्म भरण्यापासून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कौन्सिलिंग करीत आहोत.
-सुनील राऊत(संचालक,हायटेक एज्युकेशन)