-6.6 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

spot_img

संमतीने शरीरसंबंध; बलात्काराचा गुन्हा होत नाही : बलात्कार प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

‘तरुण आरोपी व फिर्यादी यांच्यातील शरीरसंबंध संमतीने होते, असे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे आरोपीवर बलात्काराचा गुन्हा होत नाही,’ असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीला जवळपास दोन महिन्यांनंतर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

 

अटीशर्थींसह जामीन मंजूर

‘आरोपीने या प्रकरणातील साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकायचा नाही किंवा त्यांना धमकवायचे नाही, स्वत:चा आताचा निवासी पत्ता, मोबाइल क्रमांक याचा तपशील न्यायालयात द्यायचा. ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेचे एक किंवा दोन हमीदार द्यायचे’, अशा अटी घालून अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. पवार यांनी तरुणाला नुकताच जामीन मंजूर केला.

 

‘लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले आणि नग्न व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली,’ असा आरोप करत फिर्यादी तरुणीने पोलिसांत एफआयआर नोंदवल्यानंतर गोराई पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला ५ डिसेंबर २०२५ रोजी अटक केली. पोलिसांनी आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. त्यानंतर त्या तरुणाने ॲड. संदीप कदम यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता.

‘आमचे प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर संबंध बिघडले आणि कुटुंबीयांच्या दबावामुळे फिर्यादीने पोलिस तक्रार केली. मी आजही तिच्याशी विवाह करायला तयार आहे’, असे म्हणणे तरुणातर्फे मांडण्यात आले. तर ‘आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून आणि व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्काराचा गुन्हा केला आहे’, असे म्हणत सरकारी वकील पूर्णिमा राठोड यांनी अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. ‘जामिनावर सुटल्यास आरोपी जप्त मोबाइलमधील डेटा मिळवून इंटरनेटवर अपलोड करू शकतो,’ असा युक्तिवाद मांडत फिर्यादीतर्फे ॲड. जयेश भागिया यांनी विरोध दर्शवला.

बलात्काराचा गुन्हा होत नाही

मात्र, ‘बलात्कार झाल्याचा आरोप असला तरी, संबंधित हॉटेलचे नाव किंवा तपशील फिर्यादीने दिलेले नाहीत. कोणत्या हॉटेलमध्ये नेले, याचा ठोस पुरावा सादर केलेला नाही. हॉटेल नोंदींवरून आरोपी व फिर्यादी एकत्र वास्तव्यास होते, ज्यातून परस्पर संमतीने शारीरिक संबंध झाल्याचे सूचित होते. त्यामुळे प्रथमदर्शनी बलात्काराचा गुन्हा दिसत नसून भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अन्वये (लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित करणे, कमाल शिक्षा दहा वर्षे) गुन्हा दिसतो, ‘, असे निरीक्षण न्यायाधीशांनी आदेशात नोंदवले.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles