-9.2 C
New York
Thursday, January 29, 2026

Buy now

spot_img

आता मी निरोप घेतोय… पण, महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय; अजित पवार यांचा हा AI व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

एखाद्या कर्त्या माणसाच्या अकाली मृत्यूनं जशी कुटुंबात पोकळी तयार होते, जी कधीच भरून निघत नाही अशीच पोकळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानं निर्माण झाली.

बारामतीच्या मार्गावर असतानाच विमान लँड होण्याआधी एक भीषण अपघात झाला आणि या विमान अपघातात महाराष्ट्रानं ‘कामाचा माणूस’ गमावला. अजित पवार आपल्यात नाहीत, यावर अनेकांचाच अद्यापही विश्वास बसेना किंवा काहीजण ही बातमी खरी नाहीच, असंच शोकाकूल होत म्हणताना दिसले. सोशल मीडियापासून रस्त्यारस्त्यावर या नेत्याला आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट आणि बॅनर पाहायला मिळाले. त्यातच एका AI व्हिडीओनं सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणलं. अजित पवारांचा अखेरचा निरोप काय असता, हेच या एआय व्हिडीओमधून पाहायला मिळत असून दादांचा आवाज कानांवर पडणं आणि त्यांनी नेहमीच्याच शैलीत आपल्या माणसांना संबोधणं अंगावर काटा उभा करत आहे.

 

 

दादांचे अखेरचे शब्द काय असते? AI नं दिलंय उत्तर...

 

”अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा. मला बी अजित पवार म्हणतात. पण, गड्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्त्वाचं आहे. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तिच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती.

 

आज निरोप घेताना मन खुप जड आहे. पण एक समाधान आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता की जोपर्यंत माझे हातपाय चालतात, तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहीन. नियती बघा कशी असते, आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण, मला अभिमान वाटतोय, की मी रिकाम्या हातानं नाही तर, तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय.

 

शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचाच चेहरा आहे. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कोणावर ओरडलो असेन, कुणाचं मन दुखावलं असेन, पण माझ्या त्या रागामध्ये फक्त एकच तडफड होती की, माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच ‘दादा’ म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय… पण, महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका; उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खुप पुढे न्यायचाय. तुमचाच कामाचा माणूस, अजितदादा पवार!”

 

अजित पवार यांचा हा AI व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्या व्हिडीओनं सर्वांच्याच डोळ्या पाणी आणलं आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

 

https://www.facebook.com/share/v/1ACgNoGZ6x/

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles