महाराष्ट्रातील बारामतीजवळ विमान अपघाताची गंभीर घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री जित पवार यांचे विमान क्रॅश झाले असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
अधिकारी आणि स्थानिक प्रशासन त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून असून बचाव व तपास कार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.दरम्यान खा. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी आ.सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना झाल्याची बातमी आहे.


