-2.7 C
New York
Wednesday, December 31, 2025

Buy now

spot_img

कार खरेदीचा बहाणा करून कार लुबाडणारी टोळी उघडकीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड शहर पोलिसांची अमरावती येथून दोन आरोपींना अटक

 

बीड |

 

 

कार खरेदी करण्याचा बहाणा करून वाहन मालकांची फसवणूक करणारी टोळी बीड शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात अमरावती येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी कार खरेदीच्या नावाखाली वाहन ताब्यात घेऊन ती परत न करता फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

फिर्यादी सचिन आसाराम बोराडे, राहणार माळीवेस बारादरी बीड, कडून त्याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार, कार खरेदी करण्याचा बहाणा करून आरोपींनी सुरुवातीला काही रक्कम ऍडव्हान्स स्वरूपात दिली. उर्वरित पैसे कागदपत्रे तयार करून आणतो, आणि राहिलेले श्रीराम फायनान्स चे सर्व हप्ते भरतो अशी बतावणी केली, असे सांगून त्यांनी कार ताब्यात घेतली. मात्र, वाहनाच्या कागदपत्रांवर कोणतीही कायदेशीर सही करण्यात आली नाही तसेच उर्वरित रक्कमही दिली गेली नाही. त्यानंतर सदरील कार परत न करता आरोपी फरार झाले.

या संदर्भात फिर्यादीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर बीड शहर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान अमरावती येथील गुड्डू खान रेहमत खान वय ४० वर्षे, राहणार बिस्मिल्ला नगर, लाल खडी रोड, अमरावती आणि अब्दुल राजीक अब्दुल सादिक वय ४३ वर्षे, राहणार इदगाह गेट, हैदरपूर, अमरावती या दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात सदरील कारचा वापर गोवंश चोरीसाठी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदरील कार अमरावती ग्रामीण येथील बेनवडा पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आलेली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

 

या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वाहन विक्री करताना अत्यंत दक्षता घ्यावी. केवळ जास्त किंमत देत आहे म्हणून कोणाच्याही ताब्यात वाहन देऊ नये. मध्यस्थामार्फत व्यवहार केला जात असला तरी समोरच्या व्यक्तीची संपूर्ण खात्री पटल्याशिवाय वाहन सुपूर्द करू नये. संपूर्ण रक्कम प्राप्त होऊन वाहनाची कायदेशीर नोंदणी व हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वाहन विक्री करू नये, अन्यथा सदरील वाहन परत मिळण्याची शक्यता कमी असून ते गुन्हेगारी कृत्यासाठी वापरले जाण्याचा धोका असतो.

 

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शीतलकुमार बल्लाळ, पोलीस जमादार बबन जाधव व पोलीस अंमलदार संजय राठोड यांनी केली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles