6.4 C
New York
Wednesday, December 24, 2025

Buy now

spot_img

पोलीस असल्याची बतावणी करून सांगून वृद्धेची ९६ हजारांची लूट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गेवराई |

पाडळसिंगी येथील एका ६७ वर्षीय वृद्धेला पोलीस असल्याचे भासवून त्यांच्याकडील ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. प्रयागबाई भानुदास घोडके असे या फसवणूक झालेल्या वृद्धेचे नाव असून त्यांनी या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली आहे.

प्रयागबाई या २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पाडळसिंगी येथील आठवडी बाजार करून घराकडे परतत असताना पाचेगाव फाटा येथे दोन भामट्यांनी त्यांना थांबवले. त्यातील एकाने पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले आणि “तुम्ही दागिने घातल्यास पाच हजार रुपये दंड होईल” अशी भीती घातली. या भामट्यांनी वृद्धेची दिशाभूल करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून कागदाच्या पुडीत ठेवण्यास भाग पाडले. नजर चुकवून त्यांनी मूळ दागिन्यांची पुडी स्वतःकडे ठेवून वृद्धेच्या पिशवीत खोट्या लॉकेटची पुडी टाकली आणि दुचाकीवरून पाडळसिंगीच्या दिशेने पसार झाले. काही वेळाने पिशवीतील पुडी उघडून पाहिल्यावर त्यात दागिन्यांऐवजी खोटे लॉकेट असल्याचे दिसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंगद दामोदर पिंपळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles