बीड |
बीड शहरातील पालवन चौकात वेश्याव्यवसायावर पोलिस पथकाने छापा टाकला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई, पीडित महिलेची सुटका, वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्दीत पालवण रोड ला, पालवण चौक जवळ, एक महिला एका पुरुषाच्या मदतीने आपल्या राहत्या घरामध्ये महिलांना बाहेरुन बोलावून वेश्या व्यवसाय करत आहेत.
याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक कस्तुरे व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेश्यागमनासाठी होकार देऊन त्यासाठी १००० रुपयांची मागणी केली व डमी ग्राहकास वरच्या मजल्याच्या रूममधे जायला सांगितले.
दरम्यान, डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या पुरुषास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ज्ञानोबा गदळे (वय ६१, रा. मादळमोही ता. गेवराई जि. बीड) असे सांगितले.
आरोपीची दोन पंचासमक्ष घेतली झडती
आरोपी अशोक गदळेची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या २ नोटा मिळून आल्या. तसेच रुमची झडती घेतली असता १२ विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. दोन्ही नमूद आरोपींवर पीडित महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले.
सदर पुरुषाची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या ५०० रूपयांच्या २ नोटा मिळून आल्याने त्या पंचासमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली. पीडित महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने सांगितले की, अशोक ज्ञानोबा गदळे आणि आशा सुंदर पवार (वय ४५ रा. पालवण रोड पालवण चौक जवळ जि. बीड) हे दोघे महिलांना घरी बोलवून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले.


