10.3 C
New York
Friday, November 14, 2025

Buy now

spot_img

ये अंधार कानून है…..; निकाल बाजूने लावण्यासाठी न्यायाधिशांनी केली २५ लाख रुपयांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ये अंधार कानून है…..; एकेकाळी अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या चित्रपटांची आठवण मुंबई न्यायालयात घडलेल्या घटनेने करून दिली.

माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील एका लिपीकाला तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना न्यायालयीन क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. या कारवाईमुळे न्यायालयात सुरु असलेल्या भष्ट्राचार उघडकीस आला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लिपीत चंद्राकांत हनमंत वासुदेव (वय 40) यांनी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. वासूदेव असं आरोपीचे नाव समोर आले आहे. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने न्यायालयातील न्यायाधीशांविरुध्द गुन्हा दाखल केला.

 

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या मालकीची जमीन बळजबरीने घेतल्याचा वाद 2015 पासून न्यायालयात प्रलंबित होता. ही केस 2024 मध्ये माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. दि. 9 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार कामानिमित्त न्यायालयात गेल्यानंतर लिपीक वासुदेवने संपर्क साधला. त्याने न्यायाधीशांच्या माध्यमातून निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. धक्कादायक म्हणजे ही लाच घेण्यासाठी न्यायाधीशांचे नाव घेण्यात आले.

 

 

वासुदेव वारंवार फोन करून तक्रारदाला त्रास देत होतो. सतत पैशांच्या मागणीला कंटाळून पीडितेने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याची तक्रार केली. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि मुख्य आरोपीला पकडण्यात आले. पोलिसांनी पुढील तपासासाठी आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीने लाच मागितल्याचे कबुल केले. या प्रकरणी आरोपीला माझगाव पोलीस ठाण्यात पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles