9.9 C
New York
Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वाचाळवीर प्रवक्त्यांची प्रवक्ते पदावरुन केली हकालपट्टी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांना पक्षाने नोटीस पाठवली होती. अखेर ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तसेच अमोल मिटकरी यांचीही प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झालेली आहे. मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १० नोव्हेंबर रोजी एक पत्र काढून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर केलेली आहेत. यामध्ये-

 

१. अनिल पाटील

२. रुपाली चाकणकर

३. ब्रिजमोहन श्रीवास्तव

४. चेतन तुपे

५. आनंद परांजपे

६. अविनाश आदिक

७. सना मलिक

८. राजलक्ष्मी भोसले

९. सुरज चव्हाण

१०. हेमलता पाटील

११. प्रतिभा शिंदे

१२. विकास पासलकर

१३. राजीव साबळे

१४. प्रशांत पवार

१५. श्याम सनेर

१६. सायली दळवी

१७. शशिकांत तरंगे

या नवीन सदस्यांना प्रवक्ते म्हणून पक्षाने नियुक्ती दिली आहे. तर संजय तटकरे हे कार्यालयीन चिटणीस म्हणून काम बघतील. आनंद परांजपे हे संपर्कासाठी प्रदेश कार्यालयामध्ये उपलब्ध असतील. या नियुक्त्यांव्यतिरिक्त यापूर्वी केलेल्या सर्व नियुक्त्या पक्षाने रद्द केल्या आहेत.

 

दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फलटण येथील युवती डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डॉक्टरचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता. यासह त्यांनी चाकणकरांवर इतरही गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई करण्यात आलेली आहे.

 

यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोफ म्हणून ओळख असलेले अमोल मिटकरी यांनाही प्रवक्ते पदावरुन दूर करण्यात आलेले आहे. त्यांची सातत्याने महायुतीमधील घटकपक्षांवरील विधानं आणि पक्षातील कुरबुऱ्यांमुळे त्यांना हटवले असल्याचं बोलले जातेय. वरील नावांव्यतिरिक्त इतरही कुणीही पक्षाची अधिकृत भूमिका मांडणार नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles