नगरपालिकांची प्रभाग रचना अंतिम झाली होती. मात्र, आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक होती. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या (एससी) महिलांसाठी आरक्षित असलेल्या 17 नगरपालिकेंच्या नावाची घोषणा केली आहे.
त्यामुळे 17 नगरपालिकांचा कारभार हा अनुसूचित जातींच्या महिलांच्या हातात असणार आहे. या आरक्षणामुळे राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.17 नगरपालिका एससी महिलांसाठी तर सहा नगरपालिका या अनुसूचित जमाती (एसटी) महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामध्ये वणी, भडगाव, पिंपळनेर, उमरी, यवतमाळ, शेंदूर जना घाट या नगरपालिकांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असेल्या नगरपालिकांमध्ये शिरोळ, देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा,ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुगुस,चिमूर, शिर्डी, सावदा, मैंदरगी, डिगदोहदेवी, डिग्रस, अकलूज, परतूर, बीड या नगरपालिकांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असेल्या नगरपालिकांमध्ये शिरोळ, देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा,ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुगुस,चिमूर, शिर्डी, सावदा, मैंदरगी, डिगदोहदेवी, डिग्रस, अकलूज, परतूर, बीड या नगरपालिकांचा समावेश आहे.
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
आरक्षण जाहीर होण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारी निवडीस वेग येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याचे चित्र अजुनही स्पष्ट नाही. शिवसेना महायुती करण्यास इच्छुक आहे. मात्र, भाजपने अजुनही अपेक्षित प्रतिसाद त्यांना दिला नाही. मात्र, आरक्षणाची घोषणा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर
महायुती आणि महाविकास आघाडी करायची की नाही, याचा विचार स्थानिक पातळीवरील समीकरणानुसार केला जाणार असल्याचे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेते सांगत आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती होईल त्याविरोधात महायुती लढले. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड या पालिकांमध्ये महायुतीमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई, होण्याची शक्यता आहे.