23.8 C
New York
Friday, September 12, 2025

Buy now

spot_img

बीडवरून नगरला रेल्वेने फक्त ४० रूपयात जाता येणार ; कुठं कुठं थांबणार रेल्वे?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • १७ सप्टेंबरपासून बीड व अहिल्यानगर जिल्ह्यांदरम्यान डेमू रेल्वेचे उद्घाटन होणार
  • अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ केला जाईल.
  • १७० किमी प्रवास फक्त ५-५.३० तासांत; तिकीट दर सुमारे ₹३०-₹४०.

 

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील लाखो लोकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. कारण, १७ सप्टेंबरपासून दोन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेले दोन्ही जिल्ह्याचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. १७ सप्टेंबरपासून अहिल्यानगर आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये रेल्वे सुरू होणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. डेमू रेल्वेमुळे या दोन जिल्ह्यातील प्रवास स्वस्त, आरामदायी अन् वेगवान होणार आहे.

तिकिट फक्त ४० रूपये

बीड आणि अहिल्यानगर यादरम्यान १७ सप्टेंबरपासून दररोज रेल्वे धावणार आहे. या प्रवासासाठी ३० ते ४० रूपये इतके तिकिट असू शकते. रेल्वेकडून अद्याप अधिकृत तिकिटाची घोषणा करण्यात आलेली नाही. बीड ते अहिल्यानगर हा १७० किमीचा प्रवास डेमू रेल्वे फक्त ५ ते साडेपाच तासात पूर्ण करणार आहे. कमी खर्चात वेगवान प्रवास होणार आहे. या डेमू रेल्वेमुळे अहिल्यानगर आणि बीडमधील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बीड-अहिल्यानगर, रेल्वे कुठं कुठं थांबणार?

२५ वर्षांपासून प्रलंबत असणाऱ्या बीड अहिल्यानहर-परळी रेल्वेला अखेर मुहूर्त लागलाय. मागील दोन वर्षांत हा प्रकल्प अतिशय वेगाने पूर्ण करण्यात आला. बीड-अहिल्यानगर-परळी या मार्गात धावणारी ही डेमू रेल्वे १७० किमी प्रवासात एकूण १६ स्थानकावर थांबणार आहे. बीड, राजुरी, रायमोह, विगणवाडी, घाटनांदुर. अंमळनेर, बावी, किन्ही, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह, अहिल्यानगर या स्थानकावर रेल्वे थांबणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles