बीड | प्रतिनिधी
बीड तालुक्यातील काटवटवाडी येथे सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्याने तिचा मृत्यू झाला. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव आहे. चॉकलेट घशात अडकल्याचे समजताच तिला घेऊन नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला.
घरात खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट चिमुकलीने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र चॉकलेट तिच्या घशात अडकले. श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बीड तालुक्यातील काटवटवाडी गावातील या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.


