9.4 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

चिमुरडीचा गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला, त्याच ठिकाणी वडिलांचाही मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असतानाच , बीडमध्ये आता काही लोकांच्या आत्महत्येतही वाढ होऊ लागली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली. बीडच्या इमामपूर रोड परिसरातील या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या परिस्थितीत दिसून आला. याआधी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलीचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

 

 

गळफास घेत आत्महत्या की खून?

 

दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर परिसरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतरच बोराडे यांनी आपली तीन वर्षांची मुलगी बेपत्त असल्याचं सांगितलं होतं. त्याच मुलीचा गेली दोन दिवसांपासून शोध सुरू होता. सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमागे नेमकं कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला असून याची माहिती अदयापही समोर आली नाही. संबंधित प्रकरणात ग्रामीण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पोलिसही पेचात पडलेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles