पुणे | प्रतिनिधी
लग्नानंतर केवळ पंधराच दिवसात पती नपुंसक असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वंशपरेपरेनुसार सासूला मुलगा हवा होता, त्यासाठी सूनेला सासऱ्याशी शरीरसंबंध ठेवावे लागली, अशी मागणी केली. या धक्कादायक घटनेनं पुणे हादरून गेलं आहे. संबंधित प्रकरणात आरोपी पती गौरव जयसिंग तांबे (वय 35), सासू श्रद्धा जयसिंग तांबे (56 वय) आणि सासरे जयसिंग तांबे (वय 61) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत केलेल्या एकूण तक्रारीनुसार, सासरे हे पोलीस खात्यातील निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी ओळखीचा धाक दाखवून रात्री घरात घुसत फिर्यादीला जबरदस्ती पकडले आणि शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पती गौरवचा आणि पीडित तरुणीचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
‘मी नपुंसक आहे आमच्या वंशासाठी…’
मी नपुंसक आहे, आमच्या वंशासाठी तुला माझ्या वडिलांसोबतच प्रेमसंबंध ठेवावं लागेल आणि मुलाला जन्म द्यावा लागेल, असे पत्नीनं सांगितलं. त्यानंतर सासूने आणि पतीने वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली होती. १० सप्टेंबर रोजी सासरे जयसिंग तांबे यांनी फिर्यादीच्या घरी घुसून जबरदस्ती शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.