16.2 C
New York
Wednesday, June 4, 2025

Buy now

spot_img

गुंडगिरी करणाऱ्या गुंडाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा गुंडगिरी करणाऱ्याला दणका ! 

 

 

बीड | प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्यापासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत अनेक गुंडावर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कार्यवाही करण्याची मोहीम राबविली आहे. त्यानुसार पोनि पो.स्टे. पेठ बीड यांनी दिनांक 13.05.2025 रोजी शेख नवीद शेख चाँद वय 27 वर्षे रा. जामा मज्जीद जवळ, मोमीनपुरा बीड याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी बीड यांना सादर केला होता.

 

 

सदर स्थानबध्द इसमाविरुध्द पो. ठा. पेठ बीड येथे घराविषयी आगळीक करणे, विनयभंग करणे, ओळखीचा फायदा घेऊन लुटणे, गैरकायदयाची मंडळी जमविणे, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, रस्ता आडविणे, पुरावा नष्ट करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जमाबंदी आदेशाचे उल्लंघनकरणे, बाल लैंगिक अत्याचार करणे, फौजदारी कट रचने, अजीव कारवासच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध करणे, जादुटोण प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करणे, ठकवणुक करणे, बनावटी करण करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण सात गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसम हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सवईचा असल्याने पेठ बीड पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासुन करडी नजर होती. तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधारावे म्हणुन यापुर्वी कलम 129 BNSS प्रमाणे दि. 02.09.2024 रोजी त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गंभीर गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता. त्याची बीड शहरात व पेठ बीड परीसरात प्रचंड दहशत आहे. त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देवुन दहशत निर्माण करुन गुन्हे करत होता.

 

 

 

या प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांनी दि. 03.06.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा उदात्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबतचे दिले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पोनि पेठ बीड व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. सदर आदेशावरुन पो.नि. पेठ बीड यांनी ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदर इसमास दिनांक 03.06.2025 रोजी 23.22 वा. बीड शहरात कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 04.06.2025 रोजी 04.15 वा. हजर करुन स्थानबध्द केले आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपोअ अंबाजोगाई सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शिवाजी बंटेवाड स्थागुशा बीड, पो.नि. अशोक मुदीराज, पोउपनि मन्सुर शाह, पोह/सुभाष मोठे, नितेश माने, अश्पाक शेख, अल्ताफ शेख, अजीत शिकेतोड सर्व पो.स्टे. पेठ बीड यांचेसह, सपोउपनि अभिमन्यु औताडे, बिबीषण चव्हाण नेमणुक वाचक/स्थागुशा बीड यांनी केलेली आहे.

 

 

गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए कायदयाअंतर्गत कठोर कारवाई

आगामी काळात जिल्हाभरात वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर, धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त एम.पी.डी.ए कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिले आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles