जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून सहभागी व्हावे-बापूराव भालेकर
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील सुतार समाजातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बीड जिल्हा विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या वतीने २६ मे २०२५ रोजी विश्वकर्मा मंदिर तळेगाव, बीड येथे गुण गौरव करण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेसह नाव नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा सुतार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूराव भालेकर यांनी केले आहे.
विश्वकर्मा सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केलेे जात आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीचा मोठा सहभाग मिळत आहे. विश्वकर्मा जयंती उत्सव समितीच्या* प्रयत्नाने प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला प्रभू विश्वकर्मा पूजन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते . येत्या २६ मे २०२५ रोजी समाजातील उद्योगपती गंगाधरराव आगलावे यांच्या वतीने विश्वकर्मा पूजन व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.याच दिवशी समाजातील दहावी आणि बारावी परीक्षा 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गुणानुक्रमे इयत्ता दहावी व बारावी मधील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना उद्योगपती समाजभूषण गंगाधरराव आगलावे यांचे वतीने पारितोषिक देण्यात येणार आहेत.
प्रथम पारितोषिक कै.राधाबाई दशरथ आगलावे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम ईयत्ता दहावी २५०१ रु. बारावी २५०१ रुपये, द्वितीय पारितोषिक कै.दशरथराव कृष्णाजी आगलावे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम ईयत्ता दहावी १५०१ रु. बारावी १५०१ रुपये, तृतीय पारितोषिक कै.किशोर गंगाधरराव आगलावे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम ईयत्ता दहावी ११०१ रु. बारावी ११०१ रुपये, तसेच 75% पेक्षा जास्त गुणवत्ताधारक इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मानपत्र देऊन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम दि. २६ मे २०२५ रोजी प्रभू विश्वकर्मा मंदिर, नगर रोड तळेगाव बीड. या ठिकाणी होणार आहे.
बीड जिल्ह्यातील तमाम सुतार समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या मुलांच्या कौतुक सोहळ्यासाठी आपल्या मुलांचे गुणपत्रिका दि. २४ मे २०२५ पर्यंत अरुण कुंडलकरसर मोबा. नं. ९४२२७२०८९७, पंढरीनाथ क्षीरसागर सर मोबां. नंबर ८२०८४९५८६७, पांडुरंग उनवणेसर मो. नं. ७५८८०५६१९, राजु पांचाळ मो नं. ९७६५७६१४३६ यांच्याशी संपर्क करून गुणपत्रिकेसह नाव नोंदणी करावी असे आवाहन बीड जिल्हा सुतार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूराव भालेकर यांनी केले आहे.