11.6 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img

मुले तुमची, मग बायको कुणाची? अगोदर करुणा मुंडेची गोची, नंतर धनंजय मुंडेंची

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माजी मंत्री धनंजय मुंडे व करुणा मुंडे प्रकरण सध्या कोर्टात गाजत आहे. धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. करूणा शर्मा प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आलाय आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हानाला करुणा शर्मा यांनी विरोध केला आहे. अशातच कोर्टात झालेल्या युक्तीवादात जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? असा सवाल धनंजय मुंडे यांनी कोर्टात विचारला आहे. कोर्टात काय काय झाले, ते आपण पाहू…

 

मुलांचे आई आणि वडील कोण?

 

मुलं तुमची आहेत असं म्हणता मग,करुणा आई कशी नाही, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडेसोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलाने केला आहे. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत? असा परखड सवाल न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांचा वकिलांना केला. राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असं धनंजय मुंडे यांनी कोर्टात सांगितलं आहे.

 

पोटगी देण्यावरूनही युक्तीवाद

 

करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. 15 लाखाच्या जवळपास त्या वर्षाला कमवतात. त्या इन्कम टॅक्स भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला. त्या स्वतः स्वतःच खर्च मॅनेज करत आहेत. सातत्याने करुणा माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे, असं धनंजय मुंडे यांनी कोर्टात सांगितलं. त्यामुळे त्यांना पोटगी देण्याची गरज नाही, असं धनंजय मुंडे यांच्या वकीलाचा युक्तीवाद होता. करुणा मुंडे यांची अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे. कन्स्ट्रक्शन व्यवसायात गुंतवणूक आहे. त्या इन्कम टॅक्स भरतात त्यांच्याकडे निवडणूक लढायला सुद्धा पैसे आहेत. एका व्यावसायात त्यांनी 3 करोड रुपये गुंतवणूक केली आहे त्यांना पोटगी कशाला? असा प्रश्न धनंजय मुंडे यांच्याकडून कोर्टात विचारला गेला.

 

करुणा मुंडेंचे म्हणणे काय

 

करुणा शर्मा या आर्थिकदृष्या सक्षम आहेत, असं धनंजय मुंडे यांच्या वकीलाचं म्हणणं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या की. मी निवडूक लढवली. परंतु निवडणूक लढण्यासाठी फक्त दहा हजार रुपयांच्या डीडीची गरज असते. त्या निवडणुकीमध्ये मी काही खूप मोठा खर्च केलेला नाहीये. आणि ज्या कंपन्यांचा उल्लेख केला आहे, त्या कंपन्या पाण धनंजय मुंडे यांच्याच आहेत. त्या कंपन्या आज बंद पडल्या आहेत. 2016 पासून त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाहीये.

 

करुणा मुंडे देणार पुरावे

 

या प्रकरणाची सुनावणी आता ५ एप्रिलला होणार आहे. याबाबत विचारले असता करुणा मुंडे म्हणाल्या की, मी आज पुरावे सादर करू शकले नाही. माझ्या वकिलांचा काहीतरी गैरमसज झाला होता. तसेच गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे मी लक्ष दिले नाही. मात्र पुढच्या सुनावणीला मी स्वत: लक्ष देऊन सर्व पुरावे सादर करणार आहे. एचडीएफसी बँकमध्ये आमचं जॉइंट अकाउंट आहे, धनंजय मुंडे यांची एक कोटी रुपयांची बजाजची पॉलिसी आहे, ज्यावर पत्नी म्हणून मी नॉमिनी आहे. त्यांनी जे स्विकृती पत्र लिहून दिलं आहे, त्यावर देखील मी बायको म्हणून आहे, अशी माहिती यावेळी करुणा शर्मा यांनी दिली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles