6.2 C
New York
Friday, April 11, 2025

Buy now

spot_img

पाटोदा नगर पंचायतीत खांदेपालटाची तयारी; स्वीकृत सदस्य होण्यासाठी अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा |

पाटोदा नगर पंचायतीत सध्या पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले असून विद्यमान पदाधिकारी यांचे राजीनामे घेण्यात आले असल्याची चर्चा असून, याबाबत नगर पंचायत पदाधिकारयांच्या बैठका सुरु आहेत. येत्या सोमवारी या बाबत पुन्हा बैठक बोलावली असल्याचे समजते. त्याच बरोबर स्वीकृत सदस्यांची नव्याने निवड करण्यात येणार असल्याची चर्चा होत असल्याने अनेक इच्छूक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नेत्यांकडे फिल्डनिंग लावू लागले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीत कुणाकडे नेतृत्व जाते याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान नगराध्यक्ष पद कायम ठेवत उपनगराध्यक्षपदी रोहिदास गीते यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा अंतर्गत गोटात होत आहे.

भाजप आ. सुरेश धस यांचे एकतर्फी वर्चस्व असलेल्या पाटोदा नगर पंचायतीत १५ नगरसेवक भाजपचे असून, सध्या धस यांचे अत्यंत विश्वासू असलेले राजू जाधव यांच्या पत्नी दिपाली राजू जाधव यांची अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.तर शरद बामदळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मात्र नगराध्यक्षा पदाची मुदत संपली असतानाच शासन निर्णय बदलण्यात येऊन नगराध्यक्ष पदाची पाच वर्षाची मुदत कऱण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही पदाधिकारी यांनी नगराध्यक्ष बदलाची मागणी केली होती. त्यासाठी स्थानिक पातळीवर राजकारणही केलं गेेलं. मात्र राजू जाधव यांची एकनिष्ठता, विनम्रता आणि लोकांत मिसळणारा कार्यकर्ता म्हणून असलेली ओळख त्यांना फायद्याची ठरली होती. तसेच निवडणूकीत वाद नको म्हणून नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने दिपाली जाधव या नगराध्यक्ष पदावर कायम राहील्या.

आता पुन्हा पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले असल्याची चर्चा होत असून, विद्यमान पदाधिकारयांचे राजीनामे दिले असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत सदस्यांची निवड ही नव्याने कऱण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने अनेक इच्छूक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नेत्यांकडे फिल्डनिंग लावू लागले आहेत. आष्टीला शिष्टमंडळ चकरा मारत आहेत. आता नेमकं काय होतंय याकडे लक्ष लागले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles