-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

“माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय मुंडे यांच्या जवळचे असेलेले वाल्मिक कराड यांचेही नाव समोर येत आहे. कराड यांचे नाव घेत अनेक आमदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अशात विरोधक धनंजय मुंडेंनाही यावरून लक्ष्य करत आहेत. आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी असे म्हटले आहे. याचबरोबर या प्रकरणात मा‍झ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नका असे ते म्हटले आहेत.

धनंजय मुंडेंची मागणी

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले की, “जिथे माझी बैठक होती, तिथेच मुख्यमंत्र्यांचीही बैठक होती. त्यावेळी योगायोगने आमची भेट झाली. ज्या देशमुखांची हत्या झाली आणि ज्यांनी कोणी हे केले ते फासावर जायला पाहिजेत या मताचा मी आहे. ते शेवटी माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होते. मलाही त्यांच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणाच्याही जवळचा असो. अगदी माझ्या जवळाचा असेल तर त्यालाही सोडायचे नाही म्हणत असताना, माझ्यावर आरोप करण्यामागे काय राजकारण असेल हे आपण समजू शकता.”

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे पडसाद विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार सुरेश धस, राष्ट्र्वादीचे (शरद पवार) जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी याबाबत आवाज उठवल्याचे पाहायला मिळाले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles