15 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

बीडला मिळाले नवीन पोलीस अधीक्षक; डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड|

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती. बारगळ यांची बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनीत कावत यांनी यापूर्वी संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिलं. संभाजीनगरपासून बीड हे अगदी जवळचं ठिकाण आहे. तसेच मागच्या काही काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर देखील कावत यांचं लक्ष होतं. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेनं व्हावा, यासाठी कावत यांच्याकडे हा पदभार दिल्याचं बोललं जातंय. आता बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आव्हान कावत यांच्यासमोर असणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles