9.3 C
New York
Wednesday, April 9, 2025

Buy now

spot_img

एकाच दिवशी पाच शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन, अध्यापन केले नाही व आरटीई कायद्याचा भंग तसेच पोलीस ठाण्यातील गुन्हा आणि गैरहजेरी आदी विविध कारणांनी जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर शुक्रवारी (दि.२०) निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी याबाबत आदेश निर्गमित केले. एकाच दिवशी पाच शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील आष्टी (हरिनारायण) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अध्यापन न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले. तसेच बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा भंग करणे व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन, अध्यापन केले नाही व आरटीई कायद्याचा भंग तसेच पोलीस ठाण्यातील गुन्हा आणि गैरहजेरी आदी विविध कारणांनी जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर शुक्रवारी (ता.
डी. डी. अष्टेकर, लालसाहेब बळे, मनीषा नाईकनवरे या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील सहशिक्षक डी. डी. भालेराव यांचे विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर शिक्षक हे शाळा सुरू 15 जून 2024 रोजी अनधिकृत गैरहजर असले बाबतचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे डी.डी. भालेराव यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तसेच केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेगाव येथील मुख्याध्यापक बी. के. राजगिरे हे सतत गैरहजर राहिल्या प्रकरणी संबंधीतास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात 5 शिक्षकांना एकाच दिवशी निलंबित केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles