-10.4 C
New York
Monday, December 23, 2024

Buy now

spot_img

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी; पुरावे मिळाल्यावर पाळंमुळं खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नागपूर |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिलं. बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करु, अशी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली इथंपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. बीड जिल्ह्यातील लॉसनेस स्थिती पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. अवाडा एनर्जी यांनी फार मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कामं निघत आहेत, काही लोकांना रोजगार मिळतोय. काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक वावरत असल्याचं पाहायला मिळतं. याच गुन्ह्यामध्ये 6 डिसेंबरला अवाडा एनर्जीचं ऑफिस आहे तिथं अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी तिथे गेले होते. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ व मारहाण केली.

सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.तारांनी गुंडाळून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता,पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण हा निर्घृण हत्या आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाल्मिक कराडचा संबंध कुणासोबत याचा विचार न करता कारवाई

6 डिसेंबरची ही घटना आहे अॅट्रॉसिटी उशीरा का झाली, तर यासंदर्भात फिर्याद ही इंजिनिअर ने दिली होती. सोनावणे यांनी ज्यावेळी फिर्याद दिली, तेव्हा अॅट्रॉसिटी लागू केली. सुनिल शिंदे हे आवाडा येथे हजर असताना चाटे यांच्या कॉलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली. सुदर्शन घुले यानी धमकी दिली. आवाडा कंपनीचे काम बंद करा किंवा 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली.धमकीचा गुन्हा आधी घडलाय, त्यानंतर दुसरा गुन्हा घडला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा संबंध तपासला जात आहे. या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्या सोबत व पवार साहेबांसोबतही आहेत. पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी आहे. पोलिसांचा दोष आहे फिर्याद नोंदवतो तेव्हा वस्तुस्थिती काय? हे निर्ढावलेले दिसतात. हे सहन केले जाणार नाही, बीड क्रिमिनल अॅक्टीव्हीटी करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मकोकाच्या गुन्ह्यास हे पात्र होतात, मकोका लावला जाईल, या गुन्ह्यात दुरान्वये संबंधित असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना ही गुन्ह्यात सामील केले जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भूमाफिया व इतर गुन्हेगारांवर एक मोहीम हाती घेऊन संघटीत गुन्ह्यात कारवाई करण्यात येईल. दोन प्रकारची चौकशी करणार आहेत. आयजी स्तरावरील अधिकाऱ्यांची एक एसआयटी स्थापन करू, ती चौकशी करेल. न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तीन ते सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण करणार आहोत. युवा सरपंचाच्या जीवाचे मोल पैशातून करणार नाही, पण त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत सरकार करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles