नागपूर |
बीडमधील मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवदेन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाळेमुळे खणून काढणार असून मास्टरमाईंड कोणीही असून त्याला शिक्षा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.