मुंबई |
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो. या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय. निवडणूकीचा गाजर हलवा. महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा. खोके सरकार हाय हाय. ५०० कोटीचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे.सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो. अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय. निवडणुकीचा गाजर हलवा. महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा.खोके सरकार हाय हाय. ५०० कोटींचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे. सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो. अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक होत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. @AjitPawarSpeaks #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/IB1dqLoiKG
— NCP (@NCPspeaks) March 13, 2023
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदेसरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.