-0.7 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर  |

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता गावागावात आणि राज्यातील 288 मतदारसंघात आहे. त्यामुळे, आपल्या पक्षाच्या नेत्याचं काय होणार, आपला उमेदवार विजयी होणार की नाही, यावरुन गावखेड्यात, वाड्यावस्तीत चर्चा रंगल्या आहेत.

अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होईल, अशा आशयाचे बॅनरही लागले आहेत. तर, कार्यकर्त्यांनी, मित्रांनी पैजा लावत आपला आत्मविश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

त्यामुळे, निकालानंतर मोठा जल्लोष करायचा आणि मिरवणूक काढायची याचं नियोजन सर्वच मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून, नेतेमंडळींकडून सुरू आहे. मात्र, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्‍हयांमध्‍ये निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles