राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस राहिले असतांना उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.तर पक्षाचे बडे नेते देखील त्यांच्या प्रचारसाठी दिवस रात्र एक करत आहेत. पाथर्डी येथील भाजपच्या उमेदवार मोनिका राजले यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे या पाथर्डीत गेल्या होत्या. येथे त्यांनी केलेलं विधान सध्या चांगलच गाजत आहे. मुंडे यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीने भाजपवर टीका केली आहे. त्यांचे मुंडे यांचा व्हिडीओ ट्विट करत हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पाथर्डी येथील सभेत बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यात आज जे काही चाललं आहे हे पाण्यासाठी राज्याबाहेरचे लोक आले आहे. हे लोक संबंध देशातून आले आहेत. संपूर्ण राज्यभर तब्बल ९० हजार बुथ असून त्या ९० हजार बुथवर ९० हजार लोक आले आहेत. यात गुजरातमधून आलेल्यांची संख्या जास्त आहे. भाजपाचं काम गडबडच आहे, साधं नाही. या लोकांमुळं राज्यातील ऑक्सिजन कमी झाला आहे. हे सर्व जण सगळं काही कव्हर करत आहेत आणि रेकॉर्डही करत आहेत. महायुतीची सत्ता आणण्याकरता तुमच्या लेकीनं योगदान दिलं आहे. त्यामुळे आपल्याला आमदाराला मत द्यावंच लागतंय. २० तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटण दाबा व मोनिकाताईंना विजयी करा”, असे देखील मुंडे म्हणल्या.
महाराष्ट्रद्रोही महायुती! शरद पवार गटांची टीका
पंकजा मुंडे यांच्या या व्हायरल व्हिडिओ एक्सवर पोस्टकरत महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये महाराष्ट्रद्रोही महायुती असं म्हणत लिहिलं आहे की, महाराष्ट्रात निवडणुकीचं काम करायला ९० हजार माणसं आणली आणि त्यात जास्त गुजरातवरून आली आहेत. ह्याचा अर्थ गुजरातने आता महाराष्ट्राचे बूथही हडपले आहेत. भविष्यात भाजपच्या हाती सत्ता गेली तर भाजप गुजरातला आंदण म्हणून काय काय देईल ह्याची कल्पना करा. भाजपचे मनसुबे आता स्पष्ट झाले आहेत. पण आपण आपला महाराष्ट्र गुजरातच्या हाती द्यायचा का? असा सवाल देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाने उपस्थित केला आहे.
https://x.com/NCPspeaks/status/1858027582748504386?t=v5_uKG9keRSb38Nr2C1r-A&s=19