3.1 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

अतिमहत्वाच्या घटनात्मक पदांवरील व्यक्तीसह प्रत्येक पोलिस आणि शासकीय वाहनांचीही तपासणी करण्याचा आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

 

विधानसभा निवडणुकीच्या काळात पैशांची वाहतूक करण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर प्रत्येक पोलिस वाहनांसह सर्वच शासकीय वाहनांची तपासणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिका-यांना दिला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात २६२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

 

पुण्यात १३५ कोटी रुपयांचे सोने घेऊन जाणारे वाहन हे विक्रेत्याला दागिने पुरविणा-याचे असून त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द केला आहे. असेही त्यांनी सपष्ट केले .

 

विधानसभा निवडणुकीत राज्यात पोलिसांच्या आणि सरकारी वाहनांमधून पैशांची वाहतूक करण्यात येत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर सर्व जिल्हाधिका-यांना तपासणीचा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या संदर्भात चोक्कलिंगम यांना विचारले असता ते म्हणाले की निवडणूक काळात सर्वच वाहने तपासण्याचे अधिकार पथकांना असतात या वेळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्या म्हणून सर्व जिल्हाधिकायांना पुन्हा सूचना केली आहे. या नुसार अतिमहत्वाच्या घटनात्मक पदांवरील व्यक्तीसह सर्वांची वाहने तपासण्यात येतील

तपासणी पथके जेथे तैनात करण्यात ये तात तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले जाहेत. यामुळे जे अधिकारी तिथे उपस्थित असतात.त्यांच्याकडून ही तपासणी पारदर्शी झाली पाहिजे या साठी आम्ही आग्रही आहोत. यात कुणी कुचराई केली तर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles