-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

विना परवाना प्रचार करतांना  उमेदवार दिसल्यास कायदेशीर कारवाई ; निवडणुक निरीक्षक भुवनेश प्रतापसिंग यांचा इशारा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

 

विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांनी प्रत्येक गोष्टीची ऑनलाइन परवानगी घेणे गरजेचे असून आपण ऑनलाइन घेतलेली परवानगी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर जाते.त्यामुळे प्रत्येक गोष्टीची परवानगी ऑनलाईनच घ्यावी जर कोणी परवानगी टाळाटाळ केली किंवा परवानगी न घेता प्रचार करताना आढळल्यास त्याच्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणूक निरीक्षक भुवनेश प्रतापसिंग यांनी दिला आहे.

 

 

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक यांनी आष्टी येथील तहसिल कार्यालयात उमेदवारांची बैठक सोमवार दि.४ रोजी दुपारी ५ वा.आयोजित करण्यात आली होती.यावेळी मार्गदर्शन करतांना भुवनेश प्रतापसिंग बोलत होते.यावेळी निवडणुकी निर्णय अधिकारी वसिमा शेख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय निलावाड,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोरख तरटे यांच्या आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना प्रतापसिंग म्हणाले, निवडणुकीत कोणीही गडबड न करता शांततेत निवडणुक पार पाडावी जर काहि अडचण तक्रार आल्यास सरळ माझ्याशीच संपर्क साधावा हि निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावी असे आवाहन ही त्यांनी केले.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली पाटील म्हणाल्या,प्रत्येक उमेवारांनी निवडणुक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,प्रत्येक सभेची,डिजीटल बॅनर व लहान परवाने घेणे गरजेचे असून विना परवाना जर कोणी आढळले तर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles