आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तहसिलदार पदाचा पदभार वैशाली पाटील यांनी स्विकारल्या पासून वाळू माफियांची झोप उडाली आहे.तहसिलदार पाटील शहरासह तालुक्यातील विविध भागात वाळूचे साठे शोधमोहीम सुरू केली आहे.त्यात सोमवारी पहाटे देविगव्हाण येथे ३० ब्रास वाळू जप्त करून एक ट्रॅक्टर पकडले.त्यास दंड रकमेची नोटीस बजावण्यात आली.
शहरासह तालुक्यात अवैधरीत्या वाळू येत असल्याचे गेल्या आठवड्यात झालेल्या कारवाईतून उघड झाले होते.याप्रकरणी महसूल व पोलिस विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचा सूर होता.पण नुकताच आष्टी तहसिलदार पदाचा पदभार नागपुर येथून आलेल्या वैशाली पाटील यांनी दखल घेत मंडळाधिकारी, तलाठ्यांना शहरासह अवैध वाळू साठ्यांची शोधमोहीम राबवणे सुरू करण्यास सांगितले.यात आष्टी शहरापासून पाच कि.मी.अंतरावर असलेल्या देविगव्हाण येथे दोन ठिकाणी ३० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.