याला पाड,त्याला पाड म्हणायची इच्छा नाही, पण मला खवळलं तर बघू, दोन्ही शहाणे नाहीत.तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडणू आणा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजाला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही. हा गणिमी कावा आहे. असं देखील म्हणाले.
मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही. मराठा समाजातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरंगे यांनी केले आहे.
तसेच “निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरू होणार आहे. आपल्या मागण्या त्यामाध्यमातून पूर्ण करू. आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळे पाडायचे, असं मराठा समाजातील बांधवांचं मत होते. कुणीही नाराज होण्याचं काम नये,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं.