महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या जागांवर निवडणूक लढणार याची घोषणा केली आहे. या उमेदवारांना निवडून द्यायचं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे.एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना, असं म्हणत मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. आमच्या उमेदवाराला त्रास दिला तर तुमचे उमेदवार पाडणार, आम्हाला हौस म्हणून राजकारण करायचं नाही. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना तिथे पाठवायचं आहे, असं जरांगे म्हणाले आहेत.
आता झुंजायचं तर मर्दासारखं झुंजायचं आणि निवडून आणायचं. या समाजाचा अपमान होऊ देऊ नका, मराठा समाजाचे सर्व उमेदवार निवडून आणा. आमदार आणि पक्ष नेत्याचं लेकरू बनू नका. माझा पण आहे समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे. समाजाला संपवणाऱ्याला संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
माझ्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. माझ्या रक्तात भेसळ नाही, मी बदला घेणार. एवढा विखारी अन्याय कुणीच केला नव्हता. 14 महिन्यांपासून समाज रस्त्यावर आहे आणि हे आमच्या देखत दुसऱ्यांना आरक्षण देत आहेत. मी माझ्या समाजाचा बदला घेणार तेव्हाच मरणार. माझं कुटुंब कुठे आहे ते सुद्धा मला माहिती नाही. सैरावैरा आयुष्य झालंय माझं. समाजाला संपवणाऱ्याला पहिले संपवा, तरच तुम्ही खानदानी आहात. या समाजावर सरकारने इतके वाईट दिवस आणले आहेत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे.