-0.7 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

आता सुट्ट-सुट्टच खेळू – धोंडे यांची भीम गर्जना!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • सर्व ताकदीनिशी लढण्याचा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्धार,

  • आष्टी येथे ६ नोव्हेंबरला व्यापक सभेत प्रचाराचा नारळ फोडणार

 

आष्टी |
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि मतदारसंघाच्या विकासाचे महामेरू माजी आ. भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार केला असून कसल्याही परिस्थितीत विजयश्री खेचून आणायचाच असा निर्धार केला तर, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुट्ट-सुट्टच खेळूयात, पाहु मतदार कोणाला कौल देतात ते कळेलच, तसेच आष्टी येथे ६ नोव्हेंबर रोजी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांची जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे असे माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर युवा नेते अजयदादा धोंडे, जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,माजी जि. प. सदस्य अशोक सव्वाशे,माजी सभापती साहेबराव म्हस्के, माजी जि. प. सदस्य अनुरथ सानप,माजी सरपंच बाळासाहेब पवार,
जेष्ठ नेते बबनराव झांबरे,जि. प. सदस्य रामराव खेडकर,माजी सरपंच बबनराव औटे,माजी सभापती नियामत बेग, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, युवराज सोनवणे,जि. प. सदस्य रामदास बडे, देविदास शेंडगे,ॲड. रत्नदिप निकाळजे, हरिभाऊ तांदळे व इतरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे सांगितले की, मी १९८० सालच्या निवडणुकीतही मी अपक्ष उमेदवार होतो व माझ्यासमोर आजी आणि माजी आमदार उमेदवार होते त्यावेळी मी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झालो होतो. आजही तीच परिस्थिती आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि मतदारसंघातील दहशत कमी करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याचा सल्ला माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिला.
यावेळी कालच दुःख निधन झालेले मतदारसंघाचे माजी आमदार निवृतीराव उगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली‌. कै. निवृत्तीराव उगले हे अतिशय सरळ आणि विकासाची दृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.
यावेळी माजी जि.प. सदस्य अशोकराव सव्वाशे यांनी सांगितले की माजी आ. भीमराव धोंडे यांना या निवडणुकीत अतिशय पोषक असे वातावरण आहे.
ज्येष्ठ नेते बबनराव झांबरे म्हणाले की सामान्य माणसांसाठी कल्याणकारी योजना राबवणारे मा. आ.भीमराव धोंडे एकमेव व्यक्ती आहेत. मतदारांना पुन्हा एकदा धोंडे साहेबांना आमदार करण्याची चांगली संधी आलेली आहे.
किशोर खोले यांनी सांगितले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या व्यक्तीला भाजपाने उमेदवारी दिली आहे.
माजी सभापती साहेबराव मस्के यांनी सांगितले की भीमराव धोंडे हे एक वटवृक्ष आहेत आपण त्यांच्या पारंब्या आहोत त्यामुळे वटवृक्ष आपल्याला शाबूत ठेवण्यासाठी सर्वांनी अहोरात्र कष्ट करून निवडणूक जिंकायचीच. २०१४ ते २०१९ या काळात आष्टी येथील पोलीस स्टेशनला कमी गुन्हे नोंद झाल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. मा. आ. भीमराव धोंडे हे सर्वसामान्य माणसाला चांगली वागणूक देणारे व्यक्तिमत्व आहेत.
माजी सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले की मागच्या वेळी जाणीवपूर्वक केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आली आहे याचा कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी लाभ घ्यावा.
याप्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब पवार, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, रामराव खेडकर, रामदास बडे, नियामत बेग,माऊली पानसंबळ, अशोकराव साळवे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब देशमुख,बबन आनेराव, राजपाल शेंडगे,हरिभाऊ तांदळे,बाबासाहेब गर्जे,बबनराव सांगळे, सरपंच दादासाहेब जगताप व इतरांची भाषणे झाली.
या बैठकीस जि. प. सदस्य सुरेश माळी, दिलीपराव म्हस्के, संभाजी जगताप, विठ्ठलराव बनसोडे , छगनराव तरटे,बजरंग कर्डिले, इंजि.बडे, चेअरमन राजेश धोंडे,, ॲड. खेडकर, माजी सरपंच राहुल जगताप, सरपंच अभय गर्जे, , नानाभाऊ वाडेकर, संजय धायगुडे, माजी सरपंच अमोल चौधरी, सरपंच सावता ससाणे, पांडुरंग गावडे, माजी जि. प. सदस्य सतिश झगडे, माजी सरपंच नवनाथ सानप, रावसाहेब लोखंडे, माजी सभापती काकासाहेब लांबरुंड, सरपंच ज्ञानेश्वर केदार, बाबा वाघुले, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, हरिभाऊ जंजिरे, संजय कांकरिया, आस्ताक शेख,विकास वनवे, अंकुश मुंढे, विठ्ठल लांडगे, सदाशिव दिंडे, मोहनराव घुले,सुदाम झिंजुर्के, माजी सभापती अनिल जायभाय, अज्जुभाई शेख, चेअरमन दादासाहेब हजारे, हादि शेख, संदीप नागरगोजे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, चेअरमन अरुण सायकड, बाजीराव वाल्हेकर, बाबुराव कदम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन माजी सरपंच बाळासाहेब पवार व डॉ मुश्ताक शेख यांनी केले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles