-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीड विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आल्याचे बघायला मिळाले आहे.जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी कुठलेही शक्ती प्रदर्शन केले नाही. महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी पुतण्या विरोधात दंड थोपटलेले दिसून आलंय.

 

जयदत्त क्षीरसागर यांनी थोपटले पुतण्यांविरोधात दंड

 

राज्यात सध्या काका पुतण्यांची लढत अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. यात किती पुतणे आणि किती काका हे अंकगणित नाही तर केमिस्ट्री आहे. लोकांची साथ कोणी दिली, लोकांची सेवा कोणी केली, हे लोकांना आरशाप्रमाणे माहीत आहे. कोण कोण येत आहे, ते सर्वांना माहित आहे. टोलवाले, मटकेवाले, गुटखे वाले, दारू वाले, क्लब वाले, पत्त्या वाले. मी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. या शहराचा नाहीतर जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. सत्ता हे माझं अंतिम साध्य नाही, तर साधन आहे. मूलभूत सुविधा पुरवणे हे माझे प्राधान्य आहे. अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

 

नुकतेच बीड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला नसतानाच उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा संघर्ष होणार आहे. आता यात दुसरा पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची भर पडली आहे.

 

निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांना पक्षांनी उमेदवारी देण्याचे मान्य केले आणि मग उमेदवार सुद्धा अगदी प्रचाराच्या कामाला लागले. मात्र तिकीट जाहीर होण्याची वेळ आली आणि या नेत्यांची नावे मागे पडली आणि अचानक दुसऱ्याच नेत्यांची नावे जाहीर झाली. यामुळे बीडमध्ये सगळ्याच मतदारसंघांमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

 

बीड जिल्ह्यात सगळ्या मतदारसंघात बंडखोरीचे सत्र

 

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजाभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

 

गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजप चे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पूजा मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

 

केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

 

आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेबुब शेख, माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

 

बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला..

 

माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्यानेच केलेले रमेश आडसकर यांनी उमेदवारी अर्ज भरला…

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles