आष्टी मतदार संघामध्ये आमदार बाळासाहेब आजबेंनी बंडखोरी केली आहे. आज ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी आजबे इच्छुक होते. पण महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अजित पवार गटाच्या जागेवर भाजपला उमेदवारी दिल्यामुळे बीडमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले. त्यामुळे नाराज झालेल्या आजबे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबेंनी आष्टी विधानसभा मतदार संघात बंडखोरीचे हत्यार उपसले आहे? आज आमदार अजबे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण या, असं त्यांनी मतदारांना आवाहन करण्यासाठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण या पोस्टमधून आजबे यांनी घड्याळ चिन्ह काढून टाकलं आहे.
बीडमध्ये महायुतीमधील अजित पवार गटाच्या जागेवर भाजपच्या सुरेश धसांना उमेदवारी दिल्याने आमदार बाळासाहेब आजबे नाराज आहेत. यामुळेच बाळासाहेब आजबे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आजबे यांच्या या निर्णयामुळे बीडमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, अगोदरच भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्यानंतर आता बाळासाहेब अजबे हे देखील आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. तर उमेदवार सुरेश धस यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बाळासाहेब आजबेंच्या निर्णयामुळे अजित पवार गटाचे देखील नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे.