समाजातील शेतकरी,शेतमजूर,व्यापारी, दीनदलित, ऊसतोड कामगारांसाठी अहोरात्र काम करत आहे..
आष्टी (प्रतिनिधी)
राजकारणात प्रवेश केल्यानंतर जामगावचा सरपंच आणि जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाल्यावर समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे जनता जनार्दनाने १९९९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला आमदार केले सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये काही चुका झाल्यामुळे पराभव झाला तरीही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, हमाल, मापाडी, ऊसतोड कामगार दीन दुबळे, वंचित समाज यांना बरोबर घेऊन अहोरात्र काम करत आहे.विधान परिषदेमध्ये मध्यंतरी काम केले परंतु विधानसभा सदस्य म्हणून गेली दहा वर्ष काम करण्यास संधी मिळालेली नाही ही संधी आपण आशीर्वाद दिल्यास पुन्हा मिळणार आहे त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघातील जनतेने सेवेची संधी द्यावी असे भावनिक आवाहन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार₩ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले .
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले,राजकारणाची सुरुवात करतानाच सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत हाच उद्देश ठेवून आपण राजकारणात आलो असून महाविद्यालयीन जीवनानंतर सरपंच पदी काम करताना शासकीय कामकाज कसे करावे ? लक्षात आले आणि त्यानंतर हरिनारायण जिल्हा परिषद गटातून राज्यात विक्रमी मताने विजयी झालो.
स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेचा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या आशीर्वादामुळे आमदार झालो .आपण जनतेचे सेवक असल्यामुळे ही सेवा अहोरात्र म्हणजे वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास करणे हा कर्तव्याचा भाग असतो रात्री अपरात्री संकट काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते माझा फोन माझ्या उशी जवळ असतो मी कधीही फोन बंद ठेवत नाही त्यामुळे जनतेच्या सतत संपर्कात असतो पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ६६ हजार दुसऱ्या निवडणुकीमध्ये ९३ हजार आणि सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये १ लाख १९ हजार मते घेऊन देखील पराभूत व्हावे लागले हे दुःख आजही मनाशी बाळगून आहे मध्यंतरी विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम केले परंतु विधानसभा सदस्य नसल्यामुळे गेली १० वर्षापासून तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी, व्यापारी, विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत कमी काम झाले असून मतदारसंघातील जनतेला याचा त्रास सोसावा लागला आहे मी जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांची मुले महागडे इंग्रजी शिक्षण घेऊ शकत नाही हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे शिक्षण दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम म्हणून आज अनेक गावोगावी जिल्हा परिषद शिक्षण घेतलेले विद्यार्थी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत .
आपण शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले त्यापैकी जुन्या तलावातील गाळ काढणे,गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर केल्या आहेत आष्टी तालुक्यातील क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील आई साहेब संस्थान अश्वलिंग पिंपळवंडी देवस्थान तसेच इतर अनेक देवस्थानांचा विकास केला आहे राज्यमंत्री म्हणून दीड वर्षाचा कालावधी मिळाला परंतु त्याच कालावधीमध्ये आष्टी पाडताना शिरूर तालुक्यातील फळबागा मोठ्या प्रमाणावर लागवडी करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे संत्रा उत्पादन वाढ झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे शेतकऱ्यांचे जीवनमान सतत उंचावत जावे यासाठी आपला प्रयत्न असतो असे सांगून ते म्हणाले मागील दहा वर्षांमध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये सिंदफणा तलावाची उंची वाढवणे, माळेवाडी, रोहतवाडी, ठोंबळ सांगवी, खुंटेफळ साठवण तलाव ही कामे गतीने मार्गे लागली नाहीत तर काही ठप्प आहेत पहिल्या विधानसभा सदस्यांच्या काळामध्येच आपण सीना ते मेहेकरी पाणी सोडणे हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले याचे ९७ टक्के काम मीच केले परंतु २०१४ ला पराभव झाला आणि राहिलेले काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला आणि योजना सुरू झाली परंतु याचे श्रेय दुसरेच घेत आहेत अशी टिप्पणी करून ते म्हणाले की आता निवडणूक आल्यानंतर काहीजण हालचाल करू लागले आहेत मध्यंतरीच्या कोरोना कालावधीमध्ये आणि बिबट्या च्या दहशतीच्या वातावरणामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधी घरात बसून होते आता निवडणूक आल्यानंतर त्यांना लोकांना भेटण्याचे आठवण आली आहे असे सांगून शेतकरी दूध उत्पादकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान जाहीर केले तसेच कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहून साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान याच शासनाने मंजूर केले असल्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २१ कोटी ७५लाख रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला असून आपण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासोबत काम केले असल्यामुळे त्यांचे शिकवणीतून सर्वसामान्य जनतेसाठी कसे काम करायचे याचे धडे घेतलेले असून वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षेला घाबरत नाही त्याप्रमाणे मी निवडणुकीला घाबरत नाही मात्र परीक्षेमध्ये एक्सलंट कामगिरी गुणवंत विद्यार्थी म्हणून ७५ टक्के पेक्षा मार्क मिळवायचा माझा प्रयत्न सुरू असून या निवडणुकीमध्ये चांगले यश मिळावी यासाठी आपण मला मार्क देण्याची आवश्यकता आहे तालुक्यातील जनतेचे प्रेम माझ्या कुटुंबीयांना सतत मिळाले आहे याचे कारण म्हणजे आम्ही माझे मोठे बंधू देविदास धस पुतण्या मुलगा जयदत्त धस सागर धस असे आम्ही संपूर्ण कुटुंबीय लोकांच्या सुखदुःखात सहभागी असल्यामुळे लोकांचे आभार प्रेम आमच्या कुटुंबीयांना मिळत आहे आणि ती यापुढे मिळत राहणार आहे असा विश्वास असून गोरगरीब जनतेला केलेल्या आर्थिक मदतीचा कुठलाही हिशोब मी ठेवलेला नाही आणि ठेवणार पण नाही ऊसतोड कामगारांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की ऊस तोडणी कामगारांचे जीवनातील जीव घेणे कष्ट आणि त्यांची सुखदुःख मी जवळून पाहिले असून पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी आपण ३४ टक्के दरवाढ घेतलेली आहे यावर्षी देखील मतदान झाल्यानंतरच ऊस तोडणी साठी जावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी शेवटी केले.
यावेळी यशवंत खंडागळे,लालासाहेब शिंदे, रमजान तांबोळी, जब्बार पठाण,सुरेश उगलमुगले,महेंद्र गर्जे,शार्दूल भणगे,सलीम जहांगीर, सुखदेव सानप,अभिजित शेंडगे, रंगनाथ धोंडे, विष्णुपंत चव्हाण,अनुजा गळगटे आदी मान्यवरांचे समोचित भाषणे झाली.